वाटे.


माझी आई ती गोष्ट एकादे वेळेस सांगे व म्हणे, 'श्याम, अरे जवळ असेल ते दुसर्यारस द्यावे. दुसर्याेचे अश्रू थांबवावे, त्याला हसवावे, सुखवावे. या आनंदासारखा आनंद नाही. स्वत:च्या मुलाचे, श्याम कोणीही कोडकौतुक करील; परंतु दुसर्यााच्या मुलाचेही करील, तितक्याच प्रेमाने करील तोच थोर.'


रात्र तिसरी: मुकी फुले


"बारकू, भाकर खाल्ली की नाही रे? येतोस ना आश्रमात?' शिवाने विचारले.


'आई, वाढ ना लौकर. तिकडे सुरूसुध्दा होईल गोष्ट.' बारकू आपल्या आईला घाई करू लागला.


'कसल्या रे रोज उठून गोष्टी ऐकता? रोज तुझी घाई. जा उपाशीच. नाहीतर आल्यावर भाकर खा.' बारकूची आई म्हणाली.


बारकू खरंच निघाला. त्याला त्या भाकरीपेक्षा गोष्टीच आवडत. त्याच्या पोटाला भाकर पाहिजे होती; परंतु त्याच्या हृदयाला श्यामच्या गोष्टीच पाहिजे होत्या.


बारकू व शिवा जलदीने निघाले. वाटेत ठेच लागली तरी त्याचे शिवाला भान नव्हते.


'बोलो


53 of 468

कोणाची तरी चाहूल लागली. मांगांनी त्या आंगठया, ती सल्लेजोडी, ते शंभर रूपये घेतले व त्यांनी पोबारा केला. ते मांग काही खरे खुनी नव्हते. या कामात मुरलेले नव्हते. पण दारिद्रयामुळे हे घोर कर्म करावयास ते प्रवृत्त झाले होते. त्या क्रूर कर्माच्या मुळाशीही दया होती, प्रेम होते. स्वत:च्या मुलाबाळांच्या प्रेमाने, त्यांची खा खा दूर व्हावी म्हणून, ते मांग तो खून करू पहात होते. कोणी म्हणतात की, जगात कलह, स्पर्धा हेच सत्य आहे. परंतु त्या कलहाच्या मुळाशी, या धडपडीच्या मुळाशीही प्रेम आहे. ते प्रेम संकुचित आहे


53 of 773