बन्सरीधरीनू जयजयकार, श्यामसुंदर हरीनू जयजयकार' अशी आश्रमातील भजनाची धून ऐकू येत होती. बारकू व शिवा आले तो शेवटचे समाप्तीचे श्लोक म्हटले जात होते.


अहिंसा सत्य अस्तेय । ब्रह्मचर्य असंग्रह शरीरश्रम अस्वाद। सर्वत्र भयवर्जन ॥

सर्वधर्मी समानत्व। स्वदेशी स्पर्शभावना । ही एकादश सेवावे । नम्रत्वे व्रतनिश्चये ।


श्यामने गोष्टीस सुरूवात केली :


'आज मी फुलांची गोष्ट सांगणार आहे. लहानपणी मला फुलांचा फार नाद होता. फुलासारखी सुंदर व पवित्र वस्तू जगात कोणतीच नसेल. पृथ्वीवरच्या फुलांनी व आकाशातील तार्यां नी माझ्या जीवनावर अनंत परिणाम केलेले आहेत. माझ्या वडिलांनाही फुलांचा फार नाद. पूजेला भरपूर फुले त्यांना पाहिजे असत. जास्वंद, कर्ण, गुलाब. रास्तुरा वगैरे नाना फुलझाडे शेतावर होती. माझे वडील गणपतीचे मोठे भक्त. दररोज २१ दूर्वांची जुडी ते गणपतीला वाहावयाचे. खुरटलेल्या, वाळलेल्या दूर्वा त्यांनी कधी वाहिल्या


54 of 468

एवढेच. सृष्टीचे अंतिम स्वरूप प्रेम आहे, युध्द नाही. सहकार्य आहे, द्वेष वा मत्सर नाही. असो. भाऊंच्या बरोबरचा गडी जो पळत सुटला तो थेट आमच्या पालगड गावी गेला. त्याने घाबर्यात घाबर्याे आमच्या घरी जाऊन सारी हकीकत सांगितली. आमच्या घरातील व गावातील पुरूष मंडळी लगेच चालून गेली. पालगडला पोलिस ठाणे होते. तेथे वर्दी देण्यात आली.


घरात बातमी येताच आकान्त झाला. सार्यां्च्या तोंडचे पाणी पळाले! घरात दिवे लागले होते; परंतु सार्यांतची तोंडे काळवंडली होती. कसचे खाणे नि कसचे पिणे! तेथे


54 of 773