नाहीत. वाटेल तितके लांब जातील; परंतु हिरव्यागार, झुबकेदार लांब दूर्वा ते घेऊन येतील. 'देवाला साधी दूर्वा वाहावयाची, ती तरी चांगली नको का?' असे ते म्हणत.


माझ्या वडिलांपासून फुलांचे वेड मी घेतले; परंतु आईपासून फुलांवर प्रेम करावयास शिकलो.

मी फुलांसाठी पहाटे उठत असे. आमच्या गावात बकुल वृक्ष पुष्कळ होते. बकुळीची फुले फारच सुंदर व सुवासिक असतात. त्यांच्यात मधही असतो. लहान लहान जणू मोतीच अशी ती दिसतात! लहान लहान बटणेच जणू असे वाटते! बकुळीच्या फुलांच्या मी परडया भरभरून आणावयाचा. सकाळी फुले जमवून ठेवावयाची व दहा वाजता शाळा सुटून आल्यावर त्यांचे हार करावयाचे. वडील ते देवळातील देवांना नेऊन घालीत. सकाळी बकुळीची मोत्यासारखी फुले जमवावयाची व सायंकाळी गुलबाक्षीची फुले गोळा करावयाची. सायंकाळी गुलबाक्षीची फुले जमविण्यासाठी शाळा सुटताच मी पळत जात असे. दुसर्याऊच्या घरी जाऊन


55 of 468

तर प्राणाशी प्रसंग होता. त्या वेळेस आम्ही कोणी झालेलो नव्हतो. आईला समजू लागले होते. बायकांना लवकर समजू लागते. माझी आई ती सारा कथा आम्हाला सांगे. आई देवाजवळ गेली. निर्वाणीचा तोच एक सखा. देवाजवळ जाऊन आईने पदर पसरला. ती म्हणाली, 'देवा नारायणा! तुला माझी चिंता, तुला सारी काळजी. आई जगदंबे! तुझी मी मुलगी. मला पदरात घे. माझे कुंकू राख. माझे चुडे अभंग ठेव. माझे सौभाग्य-नको, आई आई! त्यावर कुर्हारड नको पडू देऊ! मी काय करू? कोणते व्रत घेऊ? देवा! माझी


55 of 773