साने गुरुजी लिखित “श्यामची आई” हे प्रताधिकार मुक्त आहे. हे पुस्तक विनामूल्य वाचनासाठी आहे. त्यावर सर्वांचा कायदेशीर अधिकार आहे. हे पुस्तक जास्तीतजास्त लोकांना वाटण्याचे अधिकार व जबाबदारी आम्ही आपल्याकडे देत आहोत.

श्यामचीआई (Shyamachi Aai)

लेखक : सानेगुरूजी

साने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)

"ह्या जगामध्ये असुरांच्या सृष्टीत सुरांचे वातावरण निर्माण व्हावे म्हणून ज्यांनी प्रयत्न केले त्यांत गुरुजींचे स्थान आधुनिक काळात तरी अनन्यसाधारण आहे. अजोड आहे.

`ब्राह्मणही नाही, हिंदुही नाही, न मी एक पंथाचा!

तेच पतित की, आखडिती जे प्रदेश साकल्याचा!'

केशवसुतांचा `नवा शिपाई' मला साने गुरूजींमध्ये दिसला. साकल्याच्या प्रदेशातला हा फार थोर प्रवासी. जीवनाच्या किती निरनिराळ्या अंगांत ते रमले होते. साने गुरुजींच्या डोळ्यांत अश्रू येत असत. हो येत असत. मी तर म्हणतो की तसले अश्रू येण्याचे भाग्य एकदा जरी तुमच्या


1 of 468

गोष्टीमय धर्म आहे किंवा या धर्ममय गोष्टी आहेत. गोष्टीरूपाने तू धर्म सांगत आहेस; धर्मरूपाने गोष्टी सांगत आहेस. रोजच्या आपल्या साध्या जीवनातही किती आनंद व हृदयता आपणांस ओतता येईल, हे तू दाखवीत आहेस, नाही का? या आयुष्याच्या मार्गावर सुखाला व संपत्तीला तोटा नाही. बहीणभावांचे प्रेम, गुराढोरांचे प्रेम, पशुपक्ष्यांचे प्रेम या सर्वांमुळे जीवन समृध्द, सुंदर व श्रीमंत करता येते. श्याम! तुझ्या आठवणी ऐकता ऐकता मला कितीदा रडू आले! त्या रात्री तू प्रेमाचे वर्णन करीत होतास. त्या वेळेस मला गहिवरून आले


553 of 773