साने गुरुजी लिखित “श्यामची आई” हे प्रताधिकार मुक्त आहे. हे पुस्तक विनामूल्य वाचनासाठी आहे. त्यावर सर्वांचा कायदेशीर अधिकार आहे. हे पुस्तक जास्तीतजास्त लोकांना वाटण्याचे अधिकार व जबाबदारी आम्ही आपल्याकडे देत आहोत.

श्यामचीआई (Shyamachi Aai)

लेखक : सानेगुरूजी

साने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)

"ह्या जगामध्ये असुरांच्या सृष्टीत सुरांचे वातावरण निर्माण व्हावे म्हणून ज्यांनी प्रयत्न केले त्यांत गुरुजींचे स्थान आधुनिक काळात तरी अनन्यसाधारण आहे. अजोड आहे.

`ब्राह्मणही नाही, हिंदुही नाही, न मी एक पंथाचा!

तेच पतित की, आखडिती जे प्रदेश साकल्याचा!'

केशवसुतांचा `नवा शिपाई' मला साने गुरूजींमध्ये दिसला. साकल्याच्या प्रदेशातला हा फार थोर प्रवासी. जीवनाच्या किती निरनिराळ्या अंगांत ते रमले होते. साने गुरुजींच्या डोळ्यांत अश्रू येत असत. हो येत असत. मी तर म्हणतो की तसले अश्रू येण्याचे भाग्य एकदा जरी तुमच्या


1 of 468

जाऊ नये, इथेच बसावे व सृष्टीत मिळून जावे. सृष्टीच्या मूक अशा महान संगीत सिंधूत आपल्या जीवनाचा बिंदू मिळवून टाकावा.' श्याम बोलत होता. त्याचे ओठ थरथरत होते. श्याम म्हणजे मूर्त भावना, श्याम म्हणजे मूर्त उत्कटता होती.

शेवटी दोघे मित्र आले. आश्रमाच्या गच्चीवर मंडळी जमू लागली. आकाशाच्या गच्चीत एकेक तारा येता येता सारे आकाश फुलून गेले. गच्चीत एकेक माणूस जमता जमता सारी गच्ची भरून गेली. प्रार्थनेला सुरूवात झाली. प्रार्थना संपली. क्षणभर सारी मंडळी डोळे मिटून बसली होती.

श्यामने गोष्ट सांगण्यास सुरूवात केली.


557 of 773