त्यांच्या गुलबाक्षीवरचीही फुले मी आणीत असे. कारण त्यांना ती थोडीच हवी असत? फुलांची आवड आहे कोणाला? देवपूजा कोणाला हवी आहे? देहपूजा करणारे सारे होत आहेत. फूल तोडून कोणी शेंबडया नाकात कोंबतील, नाहीतर घामट केसात खोवतील! फुले देवाच्या पूजेसाठी फार तर थोडी तोडावी. नाहीतर ती झाडावरच शोभू द्यावी. तेथे ती देवालाच वाहिलेली आहेत.
आज मी फूल तोडू शकत नाही. फूल म्हणजे परमेश्वराची रसमयी-सौंदर्यमयी मूर्ती, असे मला वाटते. परंतु लहानपणी देवासाठीच तोडून मी जमवीत असे. गुलबाक्षीच्या फुलांसाठी मुलांमुलींत भांडणे व्हावयाची. गुलबाक्षीचे फूल फार सुंदर असते. फुलांचा देठ लांब, बारीक व कोवळा असतो. देठाच्या टोकाला बारीक मणी असतो. गुलबाक्षीची फुले नाना रंगाची असतात. पिवळी, पीतांबरी, लाल, पांढरी, शिट्कावाची कितीतरी प्रकार! गुलबाक्षीचे काळे मणी फारच सुंदर दिसतात. माझी आई तुळशीच्या अंगणात बसून त्या
करूणा येऊ दे तुला, तू करूणेचा सागर. येऊ दे हो घरी सुखरूप. पाहीन त्यांना डोळे भरुन; नांदू तुझ्या आशीर्वादे सुखाने जन्मभर. मला दुसरे काही नको. नकोत हे दागिने! नकोत ती मोठी वस्त्रे! कशाला मेली ती खोती! नको मला, काही नको. पती हाच माझा दागिना. तेवढा दे देवा.' असे म्हणून आई विनवू लागली. रडू लागली.
आईने देवाला आळविले, प्रार्थिले; परंतु नुसती प्रार्थना काय कामाची? प्रत्येक गोष्टीत त्याग पाहिजे, व्रत पाहिजे. माझ्या आईने या रात्री सावित्रीचे व्रत घेतले. मित्रांनो, जीवनाच्या कठीण प्रसंगी