साने गुरुजी लिखित “श्यामची आई” हे प्रताधिकार मुक्त आहे. हे पुस्तक विनामूल्य वाचनासाठी आहे. त्यावर सर्वांचा कायदेशीर अधिकार आहे. हे पुस्तक जास्तीतजास्त लोकांना वाटण्याचे अधिकार व जबाबदारी आम्ही आपल्याकडे देत आहोत.

श्यामचीआई (Shyamachi Aai)

लेखक : सानेगुरूजी

साने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)

"ह्या जगामध्ये असुरांच्या सृष्टीत सुरांचे वातावरण निर्माण व्हावे म्हणून ज्यांनी प्रयत्न केले त्यांत गुरुजींचे स्थान आधुनिक काळात तरी अनन्यसाधारण आहे. अजोड आहे.

`ब्राह्मणही नाही, हिंदुही नाही, न मी एक पंथाचा!

तेच पतित की, आखडिती जे प्रदेश साकल्याचा!'

केशवसुतांचा `नवा शिपाई' मला साने गुरूजींमध्ये दिसला. साकल्याच्या प्रदेशातला हा फार थोर प्रवासी. जीवनाच्या किती निरनिराळ्या अंगांत ते रमले होते. साने गुरुजींच्या डोळ्यांत अश्रू येत असत. हो येत असत. मी तर म्हणतो की तसले अश्रू येण्याचे भाग्य एकदा जरी तुमच्या


1 of 468

डोके खुपसून मी निजलो होतो. आई माझ्या डोक्यावरून, माझ्या केसांवरून आपला प्रेमळ हात फिरवीत होती.

'किती रे भरभरीत शेंडी? श्याम? तेलबील नाही वाटते लावीत कधी?' आईने विचारले. परंतु माझे तिकडे लक्ष नव्हते. मी फार सुखावलो होतो.

सुखावले मन । प्रेमे पाझरती लोचन

अशी माझी स्थिती झाली होती. आई व मी, आम्ही एकत्र कधीही प्रवास केला नव्हता. इतक्या स्वतंत्रपणे, मोकळेपणे, आम्ही कधी हिंडलो नव्हतो. आई व मी होय. आम्हां दोघांचे त्या दिवशी जग होते. माझ्या मनात अनेक सुखस्वप्ने खेळत


562 of 773