फुलांच्या माळा करी. गुलबाक्षीच्या फुलांची माळ फुलांचे देठ एकात एक गुंतवून करितात. त्याला सुईदोरा लागत नाही. या माळांचेही अनेक प्रकार असतात. तोडयाची माळ. दुहेरी माळ. बायका निरनिराळया त-हेने ती गुंफतात.


त्या दिवशी रविवार होता. रोज शाळा सुटल्यावर सर्वजण फुले वेचावयास जात असू. पाटीदप्तर घरी ठेवून जो आधी पळत जाई त्याला अधिक फुले मिळत. परंतु रविवारी कोण जाईल याचा नेम नसे. त्याच्या आधीच्या रविवारी मला एकसुध्दा फूल बाकीच्या मुलांनी मिळू दिले नाही. म्हणून त्या दिवशी मी निश्चय केला की, आज आपण सारी फुले आणावयाची. लौकर जाऊन कळयाच तोडून आणावयाच्या असे मी ठरविले. गुलबाक्षीची फुले चार वाजल्यावर फुलू लागतात, सायंकाळी नीट फुलतात. फुले फूलू लागण्याच्या आधीच मी जावयाचे ठरविले.


बाहेर ऊन होते तरी मी निघाले. एक फडके बरोबर घेतले होते, तीन वाजण्याचा सुमार असेल. आमच्या शेजारच्या धोंडोपंत


57 of 468

धीर द्यावयास भारताच्या इतिहासात कितीतरी दिव्य स्त्री-पुरूष रत्ने आहेत! राम आहे, हरिश्चंद्र आहे, सीता आहे, सावित्री आहे. तुम्ही इतिहासात लिहा किंवा लिहू नका. सावित्री अमर आहे. स्त्रियांना सदैव ती धीर देईल. मृत्यूशी झगडण्याचे धैर्य देईल. मनुष्याचा पवित्र व निर्मळ निश्चय मरणाजवळ झगडण्यासही बळ देत असतो.


माझ्या आईचे सौभाग्य आले. भाऊ घरी आले. त्या वर्षापासून आई सावित्रीचे व्रत करी. दरवर्षी ज्येष्ठी पुनव येण्याच्या आधी दोन दिवस ती उपवासास सुरूवात करी. घेतलेले व्रत कधी सोडता येत नाही.


57 of 773