मास्तरांच्या व गोविंदशास्त्र्यांच्या घरापाठीमागील गुलबाक्षीच्या कळया मी तोडल्या. गुलबाक्षीच्या न फुललेल्या कळयांना घुबे म्हणतात. ते सारे घुबे मी तोडून आणिले. घरी आल्यावर मी एक ताम्हन घेतले व त्यात पाणी घालून कळया टाकून ठेविल्या.


संध्याकाळी आई म्हणाली, 'आज फुले नाही का रे आणायला जात? मागच्या रविवारच्यासारखा उशिरा गेलास तर एकसुध्दा नाही हो मिळणार. मग रडत बसशील. माळेला नाही तर नाही; पण धुपारतीला तरी चार आणून ठेव.'

'मी तर केव्हाच आणून ठेविली आहेत, तू माळ करतेस का?' मी विचारले.

'आण तर. मी येथेच तुळशीजवळ बसते. म्हणजे घरात डेखे पडायला नकोत.' आई म्हणाली.

मी ताम्हन आणावयास गेलो; परंतु ताम्हनातील फुले नीट फुलली नव्हती. ते पाहून मी खट्टद्न झालो. ती फुले परडीत घालून मी आईजवळ नेऊन दिली.

'हे रे काय, पाणीसे ठिबकते आहे? कळयाच तोडून आणल्या होत्यास वाटते? तरीच


58 of 468

या व्रतात वटपूजा करावयाची असते. आकाशाला कवटाळू पाहाणार्याष चिरंजीव अक्षय वटाची पूजा करून अक्षय सौभाग्य मिळवावयाचे. वटवृक्षाप्रमाणे कूळ वाढो, ते जगाला छाया देवो. आधार देवो, वटवृक्ष उंच वर जाऊन जणू स्वशरीराने देवाच्या पायाला स्पर्श करतो. त्या प्रमाणे कुळालाही वर जाण्याची, उन्नत होण्याची सदैव इच्छा असो. वटवृक्षास अनेक पारंब्या व तणावे फुटतात, त्याप्रमाणेच कुळविस्तार होवो व कुळाला बळकटी येवो. या व अशाच शेकडो भावना या वटपूजेने कळत वा नकळत बायकांच्या जीवनात येत असतील.

सावित्रीव्रताचे


58 of 773