साने गुरुजी लिखित “श्यामची आई” हे प्रताधिकार मुक्त आहे. हे पुस्तक विनामूल्य वाचनासाठी आहे. त्यावर सर्वांचा कायदेशीर अधिकार आहे. हे पुस्तक जास्तीतजास्त लोकांना वाटण्याचे अधिकार व जबाबदारी आम्ही आपल्याकडे देत आहोत.

श्यामचीआई (Shyamachi Aai)

लेखक : सानेगुरूजी

साने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)

"ह्या जगामध्ये असुरांच्या सृष्टीत सुरांचे वातावरण निर्माण व्हावे म्हणून ज्यांनी प्रयत्न केले त्यांत गुरुजींचे स्थान आधुनिक काळात तरी अनन्यसाधारण आहे. अजोड आहे.

`ब्राह्मणही नाही, हिंदुही नाही, न मी एक पंथाचा!

तेच पतित की, आखडिती जे प्रदेश साकल्याचा!'

केशवसुतांचा `नवा शिपाई' मला साने गुरूजींमध्ये दिसला. साकल्याच्या प्रदेशातला हा फार थोर प्रवासी. जीवनाच्या किती निरनिराळ्या अंगांत ते रमले होते. साने गुरुजींच्या डोळ्यांत अश्रू येत असत. हो येत असत. मी तर म्हणतो की तसले अश्रू येण्याचे भाग्य एकदा जरी तुमच्या


1 of 468

पोहे खाऊ, पपनसे येथेच फोडा.' पपनसे फोडण्यात आली. गाडीवानालाही नेऊन दिल्या फोडी. फारच गोड होती पपनसे.

देवीला जायची वेळ झाली. मी गाडीवानास उठविले. सुभाताई, तिची मुले, मी व माझी आई सारी गाडीत मावलो. गाडी मोठीच होती. गावाबाहेर टेकडीच्या पायथ्याशी ती देवी होती. आईने देवीची पूजा केली. लाकडी बाहुली, करंडा, बांगडया तिच्या पायांवर वाहिल्या. खणनारळांनी देवीची ओटी भरण्यात आली. सार्यांानी कपाळाला अंगारा लावला व घरच्या माणसांसाठी कागदाच्या चिटोर्या त आईने पुडी करून घेतली. मग आम्ही


580 of 773