नीट फुलली नाहीत. श्याम ! अरे झाडावर नीट फूलू तरी द्यावे की नाही त्यांना? एवढा काय अधाशासारखा गेलास उतावळा होऊन?' असे आई मला बोलत होती. तोच शास्त्रीबोवांकडची, धोंडोपंतांकडची बन्या, बापू, बाबी सारी मुले आली.
'श्यामने तुमच्या सारी आणली हो फुले तोडून! आम्हाला एकही ठेविले नाही याने!' बाबी म्हणाली.
'का रे श्याम! केव्हा चोरटयासारखा जाऊन घेऊन आलास सारी फुले?' बापू बोलला.
'चोरटयासारखा? मी नेहमी नाही वाटते येत तुमच्याकडे फुले नेण्यासाठी?' मी म्हटले.
'नेहमी आपण सारीजण बरोबर असतो.' बन्या म्हणाला.
'तुम्ही मागच्या रविवारी मला उशीर झाला तेव्हा, एक तरी फूल ठेविले होते का माझ्यासाठी?' मी विचारले.
'पण मी माझ्या परडीतले देत नव्हते का? तूच फणकार्यारने निघून गेलास. 'मला का नाही थांबलात? बरे पाहून घेईन!' असे म्हणून तू गेलास. हा असा आज सूड घ्यावयाचा होता वाटते?' बाबी म्हणाली.
माझी
दिवस जवळ येत चालले म्हणजे माझी आई गंभीर होत असे. मी त्यासंबंधीचीच एक आठवण सांगणार आहे. आतापर्यंतची ही प्रस्तावनाच होती. त्या वेळेस मी आठ-नऊ वर्षांचा असेन. सावित्रीव्रताला आरंभ होणार होता. माझी आई हिवतापाने आजारी होती. हिवताप सारखा तिच्या पाठीस लागला होता. या व्रतात तीन दिवस वडाला १०८ प्रदक्षिणा घालावयाच्या असतात. आईला जरा चालले तर घेरी येत होती.
आईने 'श्याम' अशी हाक मारली. मी आईजवळ गेलो व विचारले, 'काय आई? काय होते? पाय का चेपू?
आई म्हणाली,