साने गुरुजी लिखित “श्यामची आई” हे प्रताधिकार मुक्त आहे. हे पुस्तक विनामूल्य वाचनासाठी आहे. त्यावर सर्वांचा कायदेशीर अधिकार आहे. हे पुस्तक जास्तीतजास्त लोकांना वाटण्याचे अधिकार व जबाबदारी आम्ही आपल्याकडे देत आहोत.

श्यामचीआई (Shyamachi Aai)

लेखक : सानेगुरूजी

साने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)

"ह्या जगामध्ये असुरांच्या सृष्टीत सुरांचे वातावरण निर्माण व्हावे म्हणून ज्यांनी प्रयत्न केले त्यांत गुरुजींचे स्थान आधुनिक काळात तरी अनन्यसाधारण आहे. अजोड आहे.

`ब्राह्मणही नाही, हिंदुही नाही, न मी एक पंथाचा!

तेच पतित की, आखडिती जे प्रदेश साकल्याचा!'

केशवसुतांचा `नवा शिपाई' मला साने गुरूजींमध्ये दिसला. साकल्याच्या प्रदेशातला हा फार थोर प्रवासी. जीवनाच्या किती निरनिराळ्या अंगांत ते रमले होते. साने गुरुजींच्या डोळ्यांत अश्रू येत असत. हो येत असत. मी तर म्हणतो की तसले अश्रू येण्याचे भाग्य एकदा जरी तुमच्या


1 of 468

घाबर्यास घाबर्या म्हटले. काय तेजस्वी डोळे व भव्य भेसूर मुद्रा! काय ती ऐट! उजवीकडच्या जंगलातून डावीकडच्या जंगलात तो शिरला. रंगभूमीवर नट येतो व जातो. तसेच त्याने केले. मायलेकराच्या प्रेमाच्या गोष्टी ऐकायला का तो आला होता? देवाची करूणा पटवून द्यावयाला का तो आला होता? माझ्या आईवर पशुपक्षी प्रेम करीत. गाईगुरे, मांजरे प्रेम करीत. मांजराची गोष्ट मी शेवटी सांगणार आहे. मांजर म्हणजे वाघाची मावशी, माझ्या आईवर मांजर प्रेम करी, मग वाघ का करणार नाही? तो माझ्या आईचे दर्शन घ्यावयास आला होता. क्रूरपणा दूर ठेवून नम्रपणे वंदन करावयास तो आला होता.


594 of 773