आई सारे ऐकून घेत होती. ती शांतपणे म्हणाली, 'बन्या, बापू! ही घ्या तुम्हाला फुले. पुन्हा नाही हो श्याम असे करणार. नाही ना रे श्याम?' असे म्हणून आईने त्यांना फुले दिली.

'श्याम येत जा हो रोज संध्याकाळी फुले वेचायला; नाहीतर राग धरावयाचास तू. का आत्ताच येतोस? आपण छाप्पोपाणी, नाहीतर लक्षूबाई ताक दे, डेरा फुटला मडकं दे, तो खेळ खेळू.' बन्या म्हणाला.

माझी आई म्हणाली, 'आता उशीर झाला आहे. उद्या खेळा हो बन्या, बापू!'


मुले गेली. माझे तोंड गोरेमोरे झाले होते. आई मला म्हणाली, 'श्याम! दुसर्या च्या घरची फुले त्यांना न सांगता-सवरता आणू नये. त्यांना विचारून आणावी. आपण आधी गेलो तर त्यांना हाक मारावी; परंतु सर्वात वाईट गोष्ट म्हणजे अशी मुकी फुले तोडून आणणे. तू अधीर झालास; परंतु पदरात काही पडले नाही. फुलांना झाडावर नीट फु लू द्यावे. बाहेरच्या पाण्यात कळया किती वेळ टाकल्या तरी फुलत नाहीत.


60 of 468

'पाय नको रे चेपायला. मेले रोज चेपायचे तरी किती? तू सुध्दा कंटाळला असशील हो. पण मी तरी काय करू?'


आईचे ते करूण शब्द ऐकून मला वाईट वाटले. मी रडू लागलो. आई पुन्हा म्हणाली, 'श्याम तू दिवसभर काम करून दमतोस हो. पण उद्यापासून तुला आणखी एक काम तीन दिवस करायला सांगणार आहे, करशील ना तू बाळ?'


"कोणते काम? आई मी कधी तरी नाही म्हटले आहे का? मी म्हटले.


आई गहिवरून म्हणाली, 'नाही. तू कधीसुध्दा नाही म्हणत नाहीस, हे बघ, उद्यापासून वट-सावित्रीचे


60 of 773