साने गुरुजी लिखित “श्यामची आई” हे प्रताधिकार मुक्त आहे. हे पुस्तक विनामूल्य वाचनासाठी आहे. त्यावर सर्वांचा कायदेशीर अधिकार आहे. हे पुस्तक जास्तीतजास्त लोकांना वाटण्याचे अधिकार व जबाबदारी आम्ही आपल्याकडे देत आहोत.

श्यामचीआई (Shyamachi Aai)

लेखक : सानेगुरूजी

साने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)

"ह्या जगामध्ये असुरांच्या सृष्टीत सुरांचे वातावरण निर्माण व्हावे म्हणून ज्यांनी प्रयत्न केले त्यांत गुरुजींचे स्थान आधुनिक काळात तरी अनन्यसाधारण आहे. अजोड आहे.

`ब्राह्मणही नाही, हिंदुही नाही, न मी एक पंथाचा!

तेच पतित की, आखडिती जे प्रदेश साकल्याचा!'

केशवसुतांचा `नवा शिपाई' मला साने गुरूजींमध्ये दिसला. साकल्याच्या प्रदेशातला हा फार थोर प्रवासी. जीवनाच्या किती निरनिराळ्या अंगांत ते रमले होते. साने गुरुजींच्या डोळ्यांत अश्रू येत असत. हो येत असत. मी तर म्हणतो की तसले अश्रू येण्याचे भाग्य एकदा जरी तुमच्या


1 of 468

भातात डोळयातील टिपे गळत होती. पोटात शोक मावत नव्हता. भात गिळवत नव्हता.

'घर बांधायला पाटल्या विकल्यात, सावकाराचे देणे देण्यासाठी बायको विका.' असे वामनराव निर्लज्जपणे बोलला.

विजेसारखी आई उठली. मोरीत हात धुऊन ती बाहेर आली. तिच्या डोळयांतून शोकसंतापाच्या जणू ठिणग्या बाहेर पडत होत्या. ती थरथरत होती. ओटीच्या दारात उभे राहून आई त्वेषाने म्हणाली, 'या ओटीवरून चालते व्हा! बायको विका, असे सांगायला तुम्हांला लाज नाही वाटत? तुमच्या जिभेला काही हाड आहे की नाही? तुम्हांला बायको


609 of 773