आईच्या दुधावर बाळ पोसते तसे बाहेरच्या दुधावर पोसत नाही. घरच्या साध्या अन्नाने जशी पुष्टी येते तशी खानावळीतील दुधातुपानेही येत नाही. झाडे म्हणजे फुलांच्या माता. झाडे कळयांना जीवनरस पाजीत असतात, त्यांना फुलवितात. झाडाच्या मांडीवरच कळया चांगल्या फुलतात. फुले फुलली म्हणजे मग ती देवासाठी आणीत जा. आपल्या देवाला दोन कमी मिळाली तरी चालतील. बन्याच्या घरच्या देवांना मिळाली तरी ती देवांनाच ना? कोठे गेली तरी देवालाच मिळतील. आपल्या घरातील देवांना सारी फुले हवीत असे वाटू नये. ते देवाला आवडणार नाही. देवाच्या पूजेत सर्वांनी भाग घ्यावा. देवाला एक फूल मिळते तरी पुरे; परंतु नीट फुललेले वहा.'

'गडयांनो ! अशा खुडून आणलेल्या मुक्या कळयांबद्दल मातेलाच वाईट वाटेल. आई आपल्या लहान मुलांना मांडीवर खेळविते, घरात वाढविते व मग त्यांना जगाच्या सेवेस देऊन टाकते. त्याप्रमाणेच फुलझाडे फुलांना वाढवितात. रसमय, गंधमय


61 of 468

व्रत सुरू होईल. मला वडाला १०८ प्रदक्षिणा घालता येणार नाहीत. मला भोवळ येईल. कशी तरी पारावर तुझा हात धरून जाईन. पूजा करीन. तीन प्रदक्षिणा घालीन, बाकीच्या प्रदक्षिणा तू घाल हो बाळ.'


असे म्हणून आईने माझा हात आपल्या हातात घेतला. प्रेमळ व करूण अशा दृष्टीने तिने माझ्याकडे पाहिले.


"आई! माझ्या ग प्रदक्षिणा कशा चालतील?' मी विचारले. 'चालतील हो बाळ, देवाला डोळे आहेत. देव काही मेला नाही. त्याला सारे समजते, कळते. तू म्हणजे मीच नाही का? अरे तू माझ्या पोटचा गोळा.


61 of 773