साने गुरुजी लिखित “श्यामची आई” हे प्रताधिकार मुक्त आहे. हे पुस्तक विनामूल्य वाचनासाठी आहे. त्यावर सर्वांचा कायदेशीर अधिकार आहे. हे पुस्तक जास्तीतजास्त लोकांना वाटण्याचे अधिकार व जबाबदारी आम्ही आपल्याकडे देत आहोत.

श्यामचीआई (Shyamachi Aai)

लेखक : सानेगुरूजी

साने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)

"ह्या जगामध्ये असुरांच्या सृष्टीत सुरांचे वातावरण निर्माण व्हावे म्हणून ज्यांनी प्रयत्न केले त्यांत गुरुजींचे स्थान आधुनिक काळात तरी अनन्यसाधारण आहे. अजोड आहे.

`ब्राह्मणही नाही, हिंदुही नाही, न मी एक पंथाचा!

तेच पतित की, आखडिती जे प्रदेश साकल्याचा!'

केशवसुतांचा `नवा शिपाई' मला साने गुरूजींमध्ये दिसला. साकल्याच्या प्रदेशातला हा फार थोर प्रवासी. जीवनाच्या किती निरनिराळ्या अंगांत ते रमले होते. साने गुरुजींच्या डोळ्यांत अश्रू येत असत. हो येत असत. मी तर म्हणतो की तसले अश्रू येण्याचे भाग्य एकदा जरी तुमच्या


1 of 468

हे विराट दु:ख, सर्वव्यापी दु:ख, माझ्या लहानशा हृदयाची होळी करते. माझ्या आईसारख्या लाखो आया या भारतात आहेत. त्यांची सोन्यासारखी जीवने मातीमोल होत आहेत. मी उदास होऊ नये, तर काय करू?'

श्याम बोलेना. 'श्याम! दु:ख पाहून दु:ख दूर करण्यास उठावे; अंधार पाहून उजेड आणण्यास धडपडावे, बंध पाहून बंध तोडण्यास सरसावावे. निराश का व्हावे? वीराला जितकी संकटे अधिक, तितका चेव अधिक, स्फूर्ती अधिक.' राम म्हणाला.

परंतु मी वीर नाही; तुम्ही वीर आहात. मला तुमचा हेवा वाटतो.


616 of 773