करतात व ती विश्वंभराच्या पूजेस देण्यासाठी तयार असतात. अर्धवट खुडून आणलेल्या कळया नीट फुलत नाहीत. अर्धवट कामे नीट फुलत नाहीत, फळत नाहीत. जगात अर्धवट काही नको. जे कराल ते नीटनेटके, संपूर्ण यथासांग करा. उशीर लागला तरी हरकत नाही. काहीतरी वेडेवाकडे करण्यापेक्षा न केलेले बरे. माझी आई मला म्हणे, 'श्याम ! मुक्या कळया नको हो तोडू, त्यांना फुलायला संधी दे. त्यांना नीट फुलू दे.''


रात्र चवथी: पुण्यात्मा यशवंत


"त्या दिवशी शनिवार होता, एकादशी होती.' श्यामने गोष्ट सांगावयास सुरूवात केली.

"जरा थांब. बारकू यावयाचा आहे. काल तो भाकर न खाताच आला होता.' शिवा म्हणाला.

"तो पहा आलाच. ये बारकू ये; माझ्याजवळ बैस.' असे म्हणून गोविंदाने बारकूस आपल्याजवळ बसविले.

श्याम सांगू लागला:

"ते पावसाळयाचे दिवस होते. कोकणातील पाऊस तो. मुसळधार पाऊस ओतत होता. जिकडे


62 of 468

माझाच जणू भाग! माझेच तू रूप! तू प्रदक्षिणा घालशील त्या माझ्याच होतील. मी दुबळी, आजारी आहे हे देवाला माहिती आहे.' आई म्हणाली.


"पण मला बायका हसतील. मी नाही जाणार वडावर. शाळेत जाणारी मुले मला बघतील व शाळेत ' अहाऽ रे बायको! असे म्हणून माझी फजिती करतील. मला लाज वाटते, मी नाही जाणार! शिवाय शाळा बुडेल मास्तर रागावतील.' अशा अनेक सबबी मी सांगू लागलो.


आईची म्लान मुद्रा खिन्न झाली. ती म्हणाली 'श्याम आईचे काम करावयास कसली रे लाज? हे देवाचे काम.


62 of 773