साने गुरुजी लिखित “श्यामची आई” हे प्रताधिकार मुक्त आहे. हे पुस्तक विनामूल्य वाचनासाठी आहे. त्यावर सर्वांचा कायदेशीर अधिकार आहे. हे पुस्तक जास्तीतजास्त लोकांना वाटण्याचे अधिकार व जबाबदारी आम्ही आपल्याकडे देत आहोत.

श्यामचीआई (Shyamachi Aai)

लेखक : सानेगुरूजी

साने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)

"ह्या जगामध्ये असुरांच्या सृष्टीत सुरांचे वातावरण निर्माण व्हावे म्हणून ज्यांनी प्रयत्न केले त्यांत गुरुजींचे स्थान आधुनिक काळात तरी अनन्यसाधारण आहे. अजोड आहे.

`ब्राह्मणही नाही, हिंदुही नाही, न मी एक पंथाचा!

तेच पतित की, आखडिती जे प्रदेश साकल्याचा!'

केशवसुतांचा `नवा शिपाई' मला साने गुरूजींमध्ये दिसला. साकल्याच्या प्रदेशातला हा फार थोर प्रवासी. जीवनाच्या किती निरनिराळ्या अंगांत ते रमले होते. साने गुरुजींच्या डोळ्यांत अश्रू येत असत. हो येत असत. मी तर म्हणतो की तसले अश्रू येण्याचे भाग्य एकदा जरी तुमच्या


1 of 468



'आई! मी खरेच जाऊ का? माझ्या मनातलेच तू बोललीस! माझ्या हृदयात तू आहेस, म्हणून माझ्या हृदयातले सारे तुला कळते. आई! तिकडे एक औंध म्हणून संस्थान आहे, तेथे फी वगैरे फार कमी आहे. मी तिकडे जाऊ? माधुकरी वगैरे मागून, जेवण करीन. त्या लांबच्या गावात मला कोण हसणार आहे? तेथे कोणाला माहीत आहे? कोणाचे काही काम करीन; तू कामाची सवय मला लावली आहेसच. ओळखीच्या लोकांच्या दृष्टीआड असले की झाले. जाऊ ना? आईला मी विचारले.

'जा. माधुकरी मागणे पाप नाही; विद्यार्थ्याला तर


625 of 773