यशवंत आत आईजवळ गेला तो आईही त्याला रागे भरली. 'डाळ खात होतास का रे? कितीदा सांगितले वस्तूस हात लावू नये म्हणून?'

'आई ! मी देवाशपथ नाही हो खाल्ली डाळ, का सारीजणं मला बोलता?' असे म्हणत यशवंता बाहेर गेला व काळांब्याखाली रडत बसला.

आदल्या दिवशीचा तो प्रकार; परंतु आता तर यशवंता मरणाच्या दारी पडला होता. सत्याची परीक्षा मरणाच्या दरबारात होत असते. यशवंता निकाल मागण्यासाठी का देवाकडे निघाला? इतके का त्याच्या मनास ते लागले?


यशवंत वाचणार नाही, असे वाटले. नऊच्या सुमारास तर जास्तच झाले दुखणे. 'आई! मला ठेवा!' तो क्षीण आवाजात म्हणाला.

'माझ्याजवळच आहेस बाळ तू!' आई म्हणाली.

अशक्त व आजारी आईने मरणोन्मुख यशवंताचे डोके मांडीवर घेतले होते. तिच्या डोळयांत पाणी आले होते.

'आई, माझे डोके खाली ठेव हो. तुझी मांडी दुखेल. तुझे सांधे दुखतात.' यशवंत खोल आवाजात


65 of 468

कामाची, आम्हास लाज वाटते. परंतु वाईट पुस्तके वाचण्याची, वाईट सिनेमा पाहण्याची, तपकीर ओढण्याची, विडी-सिगरेट ओढण्याची, सुपारी खाण्याची, चैन करण्याची लाज वाटत नाही. पुण्यकर्म, सत्कर्म करण्याची लाज वाटू लागली आहे व असत्कर्म करण्यात प्रौढी व संस्कृती येऊन राहिली आहे. फार वाईट आहे ही स्थिती.

मी आईच्या पाया पडलो व म्हटले, 'आई! जाईन हो मी. कोणी मला हसो, कोणी काही म्हणो. मी जाईन. पुंडलीक आईबापाची सेवा करून मोठा झाला. देवाला बांधून आणता झाला. तुझे काम करून मला तुझा व


65 of 773