पुण्याई लागते; परंतु माझी असेल असे मला वाटत नाही. ईश्वराच्या कृपेची ती देणगी होती.'
रात्र पाचवी: मथुरी
श्यामची प्रकृती जरा बरी नव्हती. राम म्हणाला, 'आज गोष्ट नाही सांगितलीस तरी चालेल. तू पडून रहा.'
"अरे आईची आठवण म्हणजे सकल दु:खहारी मलम आहे. भक्ताला देवाचे स्मरण होताच त्याचे दु:ख हरपते, तसेच आईचे स्मरण होताच माझे. आज आईची एक सुंदर आठवण आली आहे. बसा सारे.' असे म्हणून श्यामने सुरूवात केली.
'मित्रांनो! मनुष्य गरीब असला, बाहेर दरिद्रा असला, तरी मनाने त्याने श्रीमंत असावे. जगातील पुष्कळशी दु:खे हृदयातील दारिद्रयामुळे उत्पन्न झाली आहेत. हिंदुस्थानची बाहेरची श्रीमंती सारे जग नेवो; परंतु भारतीय हृदयातील थोर व अतूट संपत्ती कोणी न नेवो म्हणजे झाले.
'आमच्या घरी मथुरी म्हणून एक कांडपीण होती. कोकणात घरोघर वाहीन पुरलेले असते. घरी असते. हे भात कांडून
घेतली होती व तो वाजवीत होता. कविहृदयाचा श्याम ऐकत होता. एकाएकी गोविंदा थांबला व त्याने श्यामकडे पाहिले. श्यामचे डोळे मिटलेले होते. तोंडावर गोड व मधुर असे तेज होते.
"चलता ना आश्रमात, प्रार्थनेची वेळ होईल.'
श्यामने डोळे उघडले. श्याम म्हणाला 'गोविंदा! बासरी म्हणजे एक दिव्य वस्तू आहे. कृष्णाच्या मुरलीने पशुपक्षी, दगड-धोंडे विरघळून जात. ते बायकांच्या गाण्यात आहे ना वर्णन:
'यमुनाबाई वाहे स्थिर नादे लुब्ध समीर रे । हालविना तरूवर पुष्प फळ पान रे ।
गोपीनाथा आल्ये आल्ये