तांदूळ करावे लागतात. हे काम करण्यास येणार्याथ बायकांना कांडपिणी म्हणतात. घरोघरच्या कांडपिणी ठरलेल्या असतात व वंशपरंपरा कांडपाचे काम करावयास त्या येतात. जणू वतनच ते. आमच्याकडे मथुरी, गजरी, लक्ष्मी अशा दोनतीन कांडपिणी होत्या. मथुरीचा मुलगा शिवराम हा आमच्याकडे काम करावयास होता, तो लहान होता. दहाबारा वर्षांचा असेल.

'मथुरी उन्हाळयाच्या दिवसात आम्हास पिकलेली करवंदे, अळू, वगैरे आणून द्यावयाची. पिकलेली काळीभोर करवंदे म्हणजे गरीब कोकणातील द्राक्षेच ती. अळूसुध्दा गोड फळ आहे. त्याचा तपकिरी रंग असतो. आत जाड बिया असतात. मथुरीच्या घरीच आळवाचे झाड होते व त्यावरचे अळू फार गोड असत. गरीब माणसे नेहमी कृतज्ञ असतात. कधी पानफूल देऊन, कधी फळ देऊन ती कृतज्ञता प्रकट करतात. कृतज्ञताबुध्दीसारखी थोर व सुंदर वस्तू या पृथ्वीवर अन्य नाही.

'का ग गज-ये, आज मथुरी नाही आली वाटतं


69 of 468

सारूनीया काम रे । वृंदावनी वाजविशी वेणू, जरा थांब रे'


"गोविंदा! लहानपणी कोकणात सुट्टीच्या दिवसात पावसाळयात मी गोवार्यांबबरोबर रानात जात असे. गाईगुरे चरत व गोवारी अलगुजे वाजवीत. माझे चुलते छान अलगुजे करीत. लहानशी बांबूची नळी; पण तिच्यात केवढी शक्ती! हल्ली ती ब्रासची वगैरे कर्कश परदेशी अलगुजे विकत घेतात. दोन रूपये त्यांना पडतात. परंतु खेडयापाडयांतील गोरगरिबांना ही बासरी आहे. मधुर, सुलभ व सुंदर! बासरी हे आपले राष्ट्रीय वाद्य आहे. श्रीकृष्णाने ते रूढ केले आहे


69 of 773