कांडायला? ही दुसरी कोण आली?' आईने विचारले.

गजरी म्हणाली, 'मथुरीला ताप आला आहे. मथुरीने या चंद्रीला पाठविले आहे.'

आपणास कामावर जाता न आले तर दुसर्याप कोणाला तरी ते करावयास पाठवून ते काम अडू न देणे, ही कर्तव्यबुध्दी त्या गरीब मोलकरणीतही होती.

'बराच आला आहे का ग ताप?' आईने विचारले.

इतक्यात मथुरीचा मुलगा शिवराम आला व म्हणाला, 'श्यामची आई! माझ्या आईला आला आहे ताप. तिला बरे वाटले म्हणजे येईल कांडायला, तोवर ही चंद्री येत जाईल.'

'बरे हं.' आई म्हणाली. शिवराम काम करण्यास निघून गेला. कांडपिणीने भात मोजून घेतले. आई कांडण घालून धुणी घेऊन विहिरीवर गेली.

दुपारी बाराएक वाजता आमची घरातील जेवणे झाली. शिवराम घरी जातो म्हणून सांगायला आला.

'गुरांना पाणी घातलेस का, शेण वगैरे त्यांचे ओढून ठेवलेस का? नाही तर गुरे पायांनी तुडवितील व त्यातच बसतील;


70 of 468

व सात लाख खेडयांत ते वाजविले जात आहे! वाजव, आळव ते गीत.'

'परंतु ती पहा घंटा वाजत आहे! प्रार्थनेस चला.' गोविंदा म्हणाला.


'हो चला. काय रे गोविंदा ! काल मी बराच वेळ सांगत बसलो का? परंतु थोडी आईची पूर्वकथा सांगितली पाहिजे होती. आज लौकर आटपीन.' श्याम म्हणाला.


'काल दहाबारा मिनिटेच तुम्ही सांगत होता. उगीच आखडते नका घेऊ. मधून मधून निरनिराळे विचार व कल्पना येतात, त्यात आमचा फायदा असतो. तो वेळ व्यर्थ का जातो?' गोविंदा म्हणाला.


बोलत बोलत


70 of 773