गवत घालून ठेव.' आई त्याला सांगत होती. शिवराम म्हणाला, 'सारे केले. आता मी जातो.' 'थांब शिवराम. इकडे ये जरा.' आई घरात गेली व केळीच्या पानावर कढत भात व लिंबाच्या लोणच्याची फोड असे घेऊन आली. एका लहानशा गंजात तिने ताक आणिले. 'शिवराम हे तुझ्या आईला हो. म्हणावं लौकर बरी हो.' असे म्हणून त्याला ते सारे देऊन आई घरात गेली. शिवरामाने पानासकट तो भात आपल्या रूमालात बांधून घेतला व हातात गंज घेऊन तो घरी गेला.

तिन्हीसांजा झाल्या. आमची शाळा सुटली होती. परवचा म्हणत होतो आम्ही. 'गज-ये! ती समई कोंडयाला पुसून नीट लख्ख करून ठेव.' आईने सांगितले. आमच्या घरात रात्री देवाजवळ नंदादीप असे. कांडणाच्या दिवशी समई पुसावयाची असा रिवाज असे. भाताच्या कोंडयाला पुसल्याने समई स्वच्छ होते. गजरी समई पुसू लागली. आई कांडण मोजून घेऊ लागली. कांडपिणीस कण्या, धापट वगैरे देण्यात आले.


71 of 468

दोघे आश्रमात आले. गच्चीवर प्रार्थनेची तयारी झाली. सारे जमले. गावातील काही मंडळी आली होती. घंटा वाजली. प्रार्थना सुरू झाली.


स्थिरावला समाधीत ! स्थितप्रज्ञ कसा असे.


वगैरे गीताईतील स्थितप्रज्ञाच्या लक्षणांची प्रार्थना सुरू झाली. ही प्रार्थना आता राष्ट्रीय प्रार्थनाच जणू झाली आहे.


प्रार्थना संपताच श्यामच्या गोष्टीसाठी मंडळी अधीर झाली. श्यामने गोष्टीस सुरूवात केली.


'माझ्या आईचे प्रेम आम्हा सर्व भावंडांत आमच्या बहिणीवर जरा जास्त होते. माझी बहीण जणू आईचीच प्रतिमूर्ती होती. आम्ही तिला अक्का म्हणतो. माझी अक्का


71 of 773