धापट म्हणजे तांदूळ सडताना जो बारीक कोंडा पडतो तो. कांडपिणी निघून गेल्या.

शिवरामाने झाडांना पाणी घातले, गुरांची दुधे काढली. आईने गाईचे दूध काढले. शिवराम घरी जावयास निघाला. सायंकाळी आईने मला गवती चहा आणून ठेवण्यास सांगितले होते. तुळशीत आले पुरले होते. त्यातील आले उकरून काढले. आई शिवरामला म्हणाली, 'शिवराम, हा गवती चहा घेऊन जा. हा आल्याचा तुकडा घे. घरी काढा करा; त्यात चार धने व पिंपळाचे पान टाका व कढत कढत आईला द्या. मग पांघरूण घाला, म्हणजे घाम येईल व मोकळी होईल. थांब हो दोन खडी साखरेचे खडे पण देते.' असे म्हणून आई घरात गेली व खडीसाखर घेऊन आली. शिवराम सारे घेऊन निघाला.

मथुरेने शिवरामाला विचारले, 'शिवराम! हे कोणी दिले?'

शिवराम म्हणाला, 'श्यामच्या आईने.'

मथुरी म्हणाली, 'देवमाणूस आहे माउली. सार्यांघची काळजी आहे तिला.' मथुरीने रात्री तो


72 of 468

दया व क्षमा, कष्ट व सोशिकता, यांची मूर्ती आहे. तिला सासरी प्रथम सासुरवास झाला; परंतु माहेरी तिने कधी सांगितले नाही. तिने स्वत:च्या मुलास एक चापटही मारली नाही. मुलांचा राग आलाच तर दूर उठून जाते व राग शांत करून येते.


माझ्या अक्काच्या लग्नाच्या वेळची गोष्ट आहे. अक्काचे कितीतरी दिवस लग्नच जमत नव्हते! तिला मंगळ होता. त्यामुळे अडचणी येत. शिवाय हुंडयाची अडचण होतीच. आमचे नाव होते मोठे. बडे घर पोकळ वासा, अशातली गत झाली होती. पूर्वीच्या इतमामाप्रमाणे राहावे असे काही


72 of 773