गवती चहा घेतला, तरी तिला घाम आला नाही. तिचा ताप निघाला नाही. सकाळी शिवराम पुन्हा कामावर आला.

'शिवराम! तुझ्या आईचे कसे आहे?' आईने विचारले.

'कपाळ लई दुखते, सारखे ठणकते; अक्षी कपाळाला हात लावून बसली आहे. रात्री झोपबी नाही.' त्याने सांगितले.

'बरे आज दुपारी जाशील तेव्हा सुंठ व सांबरशिंग देईन, ते उगाळून तिच्या कपाळास चांगला लेप द्या, म्हणजे बरे वाटेल.' आई म्हणाली.

तो जो आपल्या कामात दंग झाला. शिवराम गोठा झाडू लागला. शेणाच्या गोवर्याल घालू लागला. आई भाजी वगैरे चिरू लागली.

दोन प्रहर झाले. शिवराम आदल्या दिवसाप्रमाणे आंब्याएवढा भात, लोणच्याची फोड घेऊन निघाला. सुंठ व सांबरशिंग आईने त्याच्याजवळ दिले. सांबराचे शिंग औषधी असते असे म्हणतात. सुंठ, वेखंड, सांबरशिंग यांचा ओढा कपाळाला दिला तर डोके दुखणे राहते. इतरही कोठे दुखत असेल तर याचा लेप देतात.

काही दिवसांनी


73 of 468

मंडळीस घरात वाटे व कर्ज वाढत होते. माझ्या अक्काला सतरा ठिकाणी नाचविली, कोठे मुलगी पसंत पडली तर हुंडा आड येई. हुंडा म्हणजे मुलीच्या मानेवरचा धोंडाच तो! या हुंडयाच्या त्रासाने मुलींच्या शरीराची वाढही नीट होत नाही. त्यांना आतून चिंता जाळीत असते. 'मुलगी वाढत चालली, एकदा लवकर उरकलेच पाहिजे, कोठे बयेचा नवरा असेल कोणास माहीत!' असे शब्द मुलींच्या कानावर येत असतात. त्यांना जीवन नकोसे होते. आपल्या देशातील तरूणच नादान!

या हुंडयाची चाल नाहीशी व्हावी म्हणून वीस वर्षापूर्वी स्नेहलतेने


73 of 773