मथुरी बरी झाली. ती फारच खंगली होती. अशक्त झाली होती; परंतु ती कामावर येऊ लागली. पंधरावीस दिवस ती कामावर आली नव्हती. ती कांडावयाला आलेली पाहून आई म्हणाली, 'मथु-ये! किती ग वाळलीस तू! कांडण होईल का तुझ्याकडून?'

मथुरी म्हणाली, 'बसत उठत करू कांडण. इतके दिवस अंथरूणावर पडून खाल्ले, पुरे आता; हिंडती फिरती आता झाली आहे. चार दिवसांनी होईन धडधाकट ! तुमची माया असली म्हणजे काय उणे आहे आम्हाला?'

आई म्हणाली, 'अग सारी देवाची कृपा. आम्ही किती एकमेकांना पुरणार! बरे पण, मुलांचा भात झाला आहे. तूही चार घास खा त्यांच्याबरोबर, म्हणजे कांडायला जरा शक्ती येईल. दुपारी आज येथेच जेव पोटभर, ऐकलेस ना?'

त्या दिवशी आमच्याबरोबर मथुरीही सकाळचे जेवली. मथुरीच्या तोंडावर त्या वेळेस केवढी कृतज्ञता होती!

ती मथुरी आता म्हातारी झाली आहे. मी एखादे वेळेस कोकणात गेलो तर मथुरीला


74 of 468

बंगालमध्ये स्वत:ला जाळून घेतले. त्या वेळेस क्षणभर तरूणांनी हुल्लड केली. सभा भरविल्या, ठराव केले; परंतु पुन्हा सारे थंड! हुंडे पाहिजेत, शिक्षणाचा खर्च पाहिजे, आंगठी पाहिजे, दुचाकी पाहिजे, घडयाळ पाहिजे. मुलीचे पैसे घेणे वा मुलाचे घेणे, दोन्ही गोष्टी सारख्याच निंद्य. गाईसही विकू नये असे सांगणारा माझा थोर धर्म; परंतु त्याच धर्माचे अनुयायी मुलांमुलींसही विकतात यापरता अधर्म कोणता? तोंडाने धर्माचा तोरा सारे मिरवतात; पण कृतीने धर्माची सारी थट्टाच आहे. उदार हृदये ज्यांची असावीत ते तरूणही मेलेलेच!


74 of 773