भेटावयाला जातो. तिच्या तोंडावर सुरकुत्या पडल्या आहेत. तरीही एक प्रकारची प्रसन्नता व वत्सलता तिच्या तोंडावर दिसते. मी जाऊन पाया पडतो तर ती म्हणते, 'अरे हे काय श्याम!' तिला माझ्या आईची आठवण येते व ती म्हणते, 'श्याम! तुझी आई असती तर तुला असा सडाफटिंग न राहू देती. तुला लगीन करावयाला लावलं असतं तिनं. मेली बिचारी लौकर. सार्यां वर तिचा लोभ.'

अशी प्रेमळ व दयाळू आई मला मिळाली होती.


रात्र सहावी: थोर अश्रू


लहानपणापासून दोन्ही वेळा स्नान करण्याची मला सवय लागली आहे.' श्यामने सुरूवात केली.

'संध्याकाळी मी खेळावयास जात असे. छाप्पोपाणी, लंगडी, धावणे, लपंडाव, लक्षुंबाई ताक दे, डेरा फुटला मडके दे, असे नाना प्रकारचे खेळ आम्ही खेळत असू. खेळ खेळून आलो म्हणजे मी आंघोळ करीत असे. आई मला पाणी तापवून ठेवीत असे. आई घंगाळात पाणी आणून देई व माझे अंग चोळून वगैरे देई.


75 of 468

निंद्य गोष्टीबद्दल बंड उभारण्याचे जोपर्यंत धैर्य होत नाही तोपर्यंत काही नाही. आपल्या बहिणींच्या जीवनाचा कोंडमारा करणार्या रुढी व चाली ज्यांना टाकवत नाहीत त्यांना स्वातंत्र्य प्रिय आहे, हे मी कसे म्हणू? असे जगाने कसे म्हणावे? परंतु जाऊ दे. मी भावनाभरात कोठे तरी वहात चाललो.'


"तुम्ही भलतीकडे वाहवत चाललेत तरी आम्हाला मधच मिळणार ! आडरानात शिरलात तरी फुलेच दाखविणार; तुम्ही बोलत राहिलेत म्हणजे पुंगी ऐकून नाग डोलतो तसा आमचा अंतरात्मा डोलू लागतो.' नामदेव म्हणाला.


"तुमचे काहीही


75 of 773