दोन्ही वेळा स्नान करण्याची पध्दत फार चांगली. रात्री निजण्याचे आधी आंघोळ झालेली असली तर शरीर स्वच्छ, निर्मळ व हलके वाटते. निजावयाच्या आधी आपण प्रार्थना म्हणतो, हे मनाचे स्नान, शरीर व मन स्वच्छ असली म्हणजे झोप कशी गाढ येते.

एके दिवशी मी नेहमीप्रमाणे खेळून घरी आलो. सदरा काढला, शेंडीला तेलाचे बोट लावले व धोंडीवर जाऊन बसलो. आंघोळीची एक मोठी धोंड होती. आंघोळीचे पाणी तोंडलीच्या वेलास जात होते. संध्याकाळची आंघोळ; तिला फारसे पाणी लागत नसे. आईने खसखसा अंग चोळून दिले. उरलेले पाणी मी अंगावर घेऊ लागलो. पाणी संपले व मी हाका मारू लागलो.

'आई! अंग पूस माझे; पाणी सारे संपले. थंडी लागते मला. लवकर अंग पूस.' मी ओरडू लागलो. माझ्या लहानपणी टॉवेल, पंचे आमच्या गावात फार झाले नव्हते. वडील पुरुषमंडळी धोतर पिळून त्यालाच अंग पुशीत. एखादे जुनेर मुलांचे अंग पुसण्यासाठी असे. संध्याकाळी


76 of 468

असो ते गोड लागते. तुम्हीच ना ती शाहूनगरवासी नाटकमंडळीतील प्रख्यात नट गणपतराव यांची गोष्ट सांगितली होती? हॅम्लेटचे नाटक जाहीर केलेले असावे; परंतु गणपतराव रंगभूमीवर येऊन तुकाराम नाटकातीलच बोलू लागत! प्रेक्षक म्हणत तेच चालू राहू दे. गणपतरावांचे सारेच छान. तसेच तुमचे. तुम्ही गोष्ट सांगा वा प्रवचन द्या. आम्हाला आनंदच आहे.' गोविंदा म्हणाला.


"मग अक्काच्या लग्नाचे काय झाले?' रामने विचारले.


श्याम म्हणाला, 'रामची आपली मुद्दयाशी गाठ. बरे तर ऐका, पुष्कळसे हिंडल्याफिरल्यावर


76 of 773