आई आपल्या ओच्यालाच माझे अंग पुशी.

आई आली व तिने माझे अंग पुसले व म्हणाली, 'देवाची फुले काढ.'

मी म्हटले, 'माझे तळवे ओले आहेत; त्यांना माती लागेल.

माझे खालचे तळवे पूस.'

'तळवे रे ओले असले म्हणून काय झाले? कशाने पुसू ते?' आई म्हणाली.

'तुझे ओचे धोंडीवर पसर, त्यावर मी पाय ठेवीन. पाय टिपून घेईन व मग उडी मारीन. मला नाही आवडत ओल्या पायाला माती लागलेली. पसर तुझा ओचा.' मी घट्ट धरून म्हटले.

'हट्टी आहेस हो श्याम अगदी. एकेक खूळ कुठून शिकून येतोस कोणास ठाऊक! हं ठेवा पाय.' आईने आपले ओचे धोंडीवर पसरले. मी माझे पाय त्यावर ठेविले, नीट टिपून घेतले व उडी मारली. आईचे लुगडे ओले झाले, त्याची मला पर्वा नव्हती. तिला थोडेच ते त्या वेळेस बदलता येणार होते? परंतु मुलाच्या पायाला माती लागू नये, त्याची हौस पुरवावी म्हणून तिने आपले लुगडे ओले करून घेतले.


77 of 468

जमले एकदाचे लग्न. लग्न रत्नागिरीस व्हावयाचे होते. आम्हा सर्वांस पालगडाहून रत्नागिरीस जावयाचे होते. मी तेव्हा सहा-सात वर्षांचा असेन. मला फारसे आठवत नाही; परंतु आईच तो प्रसंग सांगत असे. मला तो खवळलेला समुद्र, त्या बैलगाडया, ते सारे आठवत आहे. गावातील व घरची पन्नास-पाऊणशे मंडळी निघाली. बरोबर गडी-माणसे होती. बैलगाडया हर्णेबंदराला लागल्या. त्या वेळेस बोटीची फार वाईट स्थिती होती. हर्णेला धक्का नव्हता. पडाव समुद्रात कमरेहून अधिक पाण्यात उभे असत. तांडेलाच्या खांद्यावर बसून


77 of 773