ती मुलासाठी काय करणार नाही, काय सोसणार नाही, काय देणार नाही?

मी घरात गेलो व देवाची फुले काढू लागलो. आई निरांजन घेऊन आली व म्हणाली, 'श्याम! पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस! तसाच मनाला घाण लागू नये म्हणून जप हो. देवाला सांग शुध्द बुध्दी दे म्हणून.'

गडयांनो ! किती गोड शब्द! आपली शरीरे व आपले कपडे यांना स्वच्छ राखण्यासाठी आपण किती धडपडतो, किती काळजी घेतो. कपडे स्वच्छ राहावे म्हणून धोबी आहेत. बूट स्वच्छ रहावे म्हणून बूटपुश्ये आहेत, अंगाला लावायला चंदनी साबण आहेत. शरीरास व कपडयास मळ लागू नये म्हणून सार्यांवचे प्रयत्न आहेत; परंतु मनाला स्वच्छ राखण्याबद्दल आपण किती जपतो? देवळाला रंग देतो; परंतु देवाची वास्तपुस्तही घेत नाही. मन मळले तर रडतो का कधी? आपले मन निर्मळ नाही म्हणून रडणारा भाग्यवान विरळा. ते थोर अश्रू या जगात दिसत नाहीत. कपडा नाही, अन्न नाही,


78 of 468

त्या पडावात जाऊन बसावयाचे. नंतर ते पडाव बोटीजवळ जावयाचे!


हर्णेबंदर जरा त्रासाचे होते. तरी तेथील देखाचा फार सुंदर आहे. हर्णेचे पूर्वीचे नाव सुवर्णदुर्ग. हर्णेच्या किल्ल्याच्या ओव्या बायकांत रूढ आहेत.


हर्णेच्या किल्ल्यावरी । तोफा मारिल्या दुहेरी । चंद्र काढिला बाहेरी । इंग्रजांनी


चंद्रसेन राजाला इंग्रजांनी बाहेर काढला, असे ही ओवी सांगते. हर्णेच्या समुद्रतीरावर नारळीची घनदाट वने आहेत. समोरच उचंबळणारा सागर पाहून ती माडाची झाडे आपल्या माना सारख्या नाचवीत असतात. समुद्राची गंभीर गर्जना सहा


78 of 773