परीक्षा नापास झाली, कोणी मेले, तर येऊन सारे रडतात. या इतर सर्व गोष्टींसाठी अश्रूंचे हौद डोळयाजवळ भरलेले आहेत; परंतु मी अजून शुध्द, निष्पाप होत नाही म्हणून कोणी तळमळतो का? अजून माझे मन घाणीत बरबटलेले आहे, असे मनात येऊन कितीकांस वाईट वाटते? मीराबाईने म्हटले आहे.

'असुवन जल सींच प्रेमवेलि बोई ।'

अश्रूंचे पाणी घालून प्रेमाची, ईश्वरी भक्तीची वेल मी वाढविली आहे. हा मीराबाईचा चरण मी कितीदा तरी गुणगुणत असतो. अश्रूंनी तुडुंब भरलेल्या हृदयातच भक्तीच्या कमळाचा जन्म होत असतो!'


रात्र सातवी: पत्रावळ


"कोकणात पुष्कळशा घरी पत्रावळीवर जेवण्याची पध्दत आहे. साधेपणात किती सुंदरता व स्वच्छता असते. ताटांना ती कल्हई लावा व ती पोटात दवडा घाण सारी. माझ्या वडिलांना पत्रावळीवर जेवणे फार आवडे. बायकांनासुध्दा त्रास कमी. ताटे घासावयास नकोत. वडील सकाळी शेतावर जावयाचे. इकडे तिकडे


79 of 468

सहा कोस ऐकू जाते. हर्णेला दीपगृह आहे. उंच टेकडीवर लाल फिरता दिवा आहे. येथे खडक आहेत अशी सूचना न बोलता तो गलबतास देत असतो. संतही असेच उंच जीवनावर उभे राहून जगाला मुकेपणाने मार्गदर्शन करीत असतात. संत हे भवसागरातील दीपस्तंभच.

'संत कृपेचे हे दीप । करिती साधका निष्पाप ॥ '


अशा अभंगाचा चरण जमलेल्या गावातील मंडळीपैकी एकाने म्हटला. खेडेगावातील वारकरी वगैरेंच्या तोंडी कितीतरी अभंग, ओव्या वगैरे असतात. त्यांना जितके पाठान्तर असते तेवढे आम्हा सुशिक्षितांस


79 of 773