फिरून, कामधाम करून ते दहाच्या सुमारास परत घरी येत असत. येताना फुले, पत्रावळीसाठी पाने, कोणा कुणब्याने दिली असली किंवा शेताच्या बांधावर केलेली असली तर भाजी असे घेऊन घरी यावयाचे. वडील मग स्नान करून संध्या, पूजा वगैरे करावयास बसत. आम्ही शाळेतून आलेली मुले पत्रावळी लावावयास बसत असू. ताज्या पानांची हिरवीगार पत्रावळ व त्याच पानांचा द्रोण.
मला प्रथम पत्रावळ लावता येत नसे. द्रोण तर अगदी साधत नसे. आमच्या कोकणात एक म्हण आहे: 'पत्रावळी आधी द्रोणा। तो जावई शहाणा ॥' पत्रावळ लावण्यापूर्वी ज्याला तिच्याहून कठीण असा द्रोण लावता येईल तो जावई शहाणाच असला पाहिजे!
घरातील मंडळी पत्रावळी लावीत बसत. कधी कधी प्रत्येकाने पाच पाच पत्रावळी लावाव्या, असे आजी ठरवून टाकी व प्रत्येकास पाने वाटून देई. नाना प्रकारच्या पानांच्या पत्रावळी लावतात. वडाची पाने, पळसाची पाने, कुडयाची पाने, धामणीची पाने,
नसते. सुशिक्षितांस इंग्रजी कवी माहीत असतात. त्यांची वचने त्यांना पाठ; परंतु ज्ञानोबा-तुकाराम यांची त्यांना आठवण नसते.
श्याम म्हणाला, 'तो लाल दिवा रात्री किती सुंदर दिसतो! रात्री आकाशात चंद्र असावा, समुद्राला प्रेमाची भरती येत असावी, त्या वेळेस समुद्राच्या वक्ष:स्थळावर शेकडो चांद नाचताना दिसतात. आपल्या गोजिरवाण्या गोर्याअगोमटया मुलाचे शेकडो फोटोच समुद्र काढून घेत आहे, असे वाटते!'
'समुद्राचा का चंद्र मुलगा?' एका लहान मुलाने विचारले.
'हो समुद्रमंथनाच्या वेळेस तो चौदा रत्नांबरोबर बाहेर