भोकरीची वाटोळी पाने, पांढर्याण चाफ्याची पाने, सर्वांच्या पत्रावळी लावतात. श्राध्दाला मोहाच्या पानांचीही पत्रावळ कोणी मुद्दाम लावतात. चातुर्मासात बायका आंब्याच्या पानांच्या किंवा फणसाच्या पानांच्या पत्रावळीवर जेवण्याचे व्रत घेतात. कोकणात पत्रावळीस धार्मिक संस्कृतीत स्थान दिले गेले आहे. झाडांची व त्यांच्या पानांची ही केवढी थोरवी आहे!
'श्याम! तू पत्रावळ लावावयास शीक. नाही तर आज जेवावयास मिळणार नाही.' असे आईने मला बजावले.
'मला लावायला येत नाही, मी काही लावणार नाही,' मीही रागानेच म्हटले.
माझी बहीण माहेरी आलेली होती, ती मला म्हणाली, 'श्याम! ये तुला मी शिकविते. कठिण का आहे त्यात काही?'
"मला नको तू शिकवायला जा.' मी उर्मटपणे त्या प्रेमळ बहिणीस उत्तर दिले. माझी अक्का फारच सुंदर पत्रावळ लावीत असे. माझे वडीलही पत्रावळ व द्रोण लावण्यासाठी गावात प्रसिध्द होते. आमच्या गावात रामभटजी म्हणून एक होते. त्यांची तर आख्यायिकाच
पडला अशी कथा आहे.' परभारे नामदेवनेच उत्तर दिले.
श्याम वर्णनाच्या भरात होता. 'आपल्या मुलाच्या अंगाखांद्यावर घालण्यासाठी समुद्राने दागदागिने आणले आहेत की काय असेही मनात येते. किंवा चंद्रच शेकडो रूपे घेऊन खाली लाटांशी खेळण्यासाठी उतरला आहे, असे वाटते. सारी मौज असते. वारे वहात असतात. नारळी डोलत असतात, लाटा उसळत असतात, दीप चमकत असतो, चंद्र मिरवत असतो आणि पडाव भरत असतो. तांडेल व खलाशी यांची आरडाओरड चाललेली असते. कोणाचे सामान राहून जाते, कोणाचे