झाली होती. जे पान हातास लागेल ते घेऊन रामभटजी टोचीत जावयाचे. चांगलेच पान पाहिजे, हे येथे नीट बसणार नाही, वगैरे विचार त्यांच्या मनात येत नसत. कसेही पान असो, रामभटजींच्या पत्रावळीत त्याला स्थान आहेच. कोणाकडे लग्नमुंज असली, प्रयोजन वगैरे असले की, गावातील मंडळी त्यांच्याकडे जमावायाची व पत्रावळी लावीत बसावयाची. गप्पागोष्टी करीत सहकार्याने कामे करावयाची. अलीकडे ती पध्दत जात चालली आहे. अशी ही पत्रावळीची परंपरा मला शिकणे भाग पडले; परंतु मी पडलो हट्टी. मी काही त्या दिवशी पत्रावळ लावली नाही.

मी पत्रावळ लावली नाही व आईने माझे पान मांडले नाही. 'ज्याने त्याने आपापली पत्रावळ घेऊन बसावे', असे ठरले होते. माझी पत्रावळ नाही. सारीजणे हसू लागली. माझ्यासाठी माझी अक्का रदबदली करू लागली. 'उद्या लावशील ना श्याम पत्रावळ? उद्या शीक हो माझ्याजवळ. आई, उद्या तो लावील हो. वाढ आज त्याला,'


82 of 468

बदलते, कोणाचे हरवते! कोणाला पडाव लागतो, कोणाला उलटी येते, ती एखाद्याच्या अंगावर होते व मग तो उसळतो. हिंदुस्थानातील सारी अव्यवस्था, सारा गोंधळ, सारा उदासीनपणा, सारी सहानुभूतिशून्यता तेथे दिसून येते.


आम्ही पडावात बसलो; पडाव चालू झाले. वल्हवणारे वल्ही मारू लागले. चुबुक चुबुक पाणी वाजत होते. वार्याटमुळे लाटांचे तुषार अंगावर उडत होते. 'शाबास, जोरसे' असे वल्हवणारे म्हणत होते, पडावात खेचाखेच होती. माझी आई अंगावरच्या मुलाला घेऊन बसली होती. माझी एक आत्याही तेथे बसली


82 of 773