असे अक्का म्हणू लागली, परंतु आम्ही एरंडासारखे फुगलो होतो.

"मी नाहीच लावणार जा. नका वाढू मला जेवायला. माझे अडले आहे खेटर. मी तस्सा उपाशी राहीन.' असे रागाने म्हणत मी ओसरीवर गेलो. पोटात तर भूक लागली होती. कोणी आणखी समजूत घालावयाला येते का, याची वाट मी पाहात होतो.

शेवटी माझी थोर निरभिमानी अक्का, तीच पुन्हा मजजवळ आली. ती म्हणाली, 'श्याम! चल रे जेवावयास. मी उद्या सासरी गेल्ये म्हणजे थोडीच येणार आहे समजवावयास! ऊठ, चल, लहानसे ठिकोळे लाव व त्यावर बस जेवावयास.' तीन पानांच्या लहान पत्रावळीस ठिकोळे म्हणतात. चार पानांच्या पत्रावळीस चौफुला म्हणतात. पळसाचे मोठे पान असले तर एकाच पानावर आम्ही मुले जेवत असू. एकच पान पुरे होत असे. वाटोळी मोठी पत्रावळ तिला घेरेदार पत्रावळ म्हणतात. माझ्या वडिलांना लहान पत्रावळ आवडत नसे. चांगली मोठी गोलदार आवडत असे. रानात


83 of 468

होती. आत्याचेही अंगावर पिणारे मूल होते. आत्या आजारी असल्यामुळे तिच्या अंगावर दूध नव्हते. वरचे दूध मुलाला पाजीत; परंतु वरच्या दुधाने तान्ह्या लेकरांना फारसे समाधान होत नाही. आईच्या दुधाची चव न्यारीच असते. ते नुसते दूध नसते. त्यात प्रेम व वात्सल्य असते. म्हणून ते दूध बाळाला बाळसे देते. तजेला देते. ज्या देण्यात प्रेम आहे त्या देण्याने देणारा व घेणारा दोघांस परमसुख होते.


किनार्या.वरील बैलगाडयांच्या बैलांच्या गळयातील घंटांचा आवाज दुरून कानावर येत होता. बंदरावरचे दिवे अंधुक दिसत होते.


83 of 773