भरपूर पाने असतात, त्यात काटकसर कशाला? 'विस्तीर्णपात्र भोजनम्' 'जेवावयास मोठे पान घ्यावे', असे ते म्हणत.

अक्काच्या शब्दांनी मी विरघळलो. सासरी गेल्यावर ती थोडीच रुसणार्याह भावाजवळ आली असती! दोन दिवस ती आली होती; तरी मी तिच्याशी नीट वागलो नाही. मला वाईट वाटले व डोळयांत पाणी आले. अक्काने माझ्या हातात पान दिले. 'हे खाली आधाराला लाव,' असे ती म्हणाली. मी हातात एक चोय घेतली व टाका लावला; परंतु चोय फार लोचट होती व टाका तुटेना. 'श्याम! ही दुसरे घे चोय. ही चांगली आहे.' असे म्हणून अक्काने दुसरी चोय जुडीतून काढून दिली. कसे तरी मोठेमोठे टाके घालून मी ठिकोळे तयार केले व घरात नेले.

'ही माझी पत्रावळ, वाढ मला.' मी आईला म्हटले.

'हातपाय धुऊन आलास का पण?' आईने विचारले.

'हो; केव्हाच हातपाय धुतले. मी काही घाणेरडा नाही.' मी म्हटले.

'घाणेरडा नाहीस; परंतु


84 of 468

बोट दूर दिसावयास लागली होती. तिचा वरचा दिवा दिसू लागला होता. तरी बोट बंदरात येऊन तिला पडाव लागावयास अर्धा तास लागला असता.

'अरे चावतोस काय असा? काय आहे प्यायला त्यात?' असे आत्या आपल्या मुलावर ओरडली. तो मुलगा अधिकच रडू लागला. काही केल्या राहीना. पडावातही गर्दी होती. इकडचे तिकडे व्हावयास जागा नव्हती. आजूबाजूला जेव्हा पुष्कळ लोक असतात, तेव्हा जर मूल रडावयास लागले तर आयांना मेल्यासारखे होते. आपल्या मुलाने हसावे व खेळावे, सर्वांनी त्याचे कौतुक करावे, त्याला घ्यावे,


84 of 773