सू सू तर करतो आहेस. नाक नीट शिंकरून ये, तो मी इकडे वाढते.' आई म्हणाली.
मी नाक स्वच्छ करून आलो व जेवावयास बसलो.
'पोटभर जेव चांगला. उगीच हट्ट करतोस. तो शेजारचा वासू एवढासा आहे; पण कशी छान लावतो पत्रावळ.' आई बोलत होती.
मी रागाने भराभर जेवत होतो, पत्रावळ कशीतरी लावलेली होती. तिचा एक टाका निघाला व माझ्या घशात अडकला. मी घाबरलो. शेवटी निघाला एकदाचा. 'टाके जातात घशात तरी म्हणे तूच पत्रावळ लाव. मला लावायला येत नाही तरी म्हणे लाव.' मी रागाने म्हणाले.
'आमच्या घशात नाही जात ते? तू निष्काळजीपणाने लावलीस याचे हे प्रायश्चित. जोपर्यंत तू चांगली पत्रावळ लावण्यास शिकणार नाहीस तोपर्यंत तुझीच पत्रावळ तुला ठेवण्यात येईल.' आई म्हणाली.
मी दुसर्या दिवसापासून चांगल्या पत्रावळी लावण्याचा निश्चय केला. अक्का पत्रावळ कशी लावते, दुमड कशी घालते, ते पाहू लागलो. काही
नाचवावे, मुके घ्यावे, यात आयांना परमानंद असतो. ते पाहून कृतार्थ वाटते; परंतु मूल जर रडू लागले तर मात्र फजिती! हसर्याच मुलाला सारे घेतात, रडणार्यातला कोण घेणार? वास्तविक रडणार्यालला घेण्याची जास्त जरूरी असते; परंतु त्याचाच सारी तिटकारा करतात. जगात सारे सुखाचे सोबती, दु:खाला कोणी नाही. दीनाला जगात कोणी नाही, पतिताला कोणी नाही. ज्याला सहानुभूतीची अत्यंत जरूरी त्यालाच त्याची अत्यंत वाण.
'दीनको दयालू दानी दूसरा न कोई'
मूल रडू लागले तर ती कटकट होते. 'झालं काय