पानांना दुमड घालावयाची असते. ज्याला आपणापेक्षा एखादी गोष्ट चांगली करता येत असेल त्याच्याजवळ जाऊन शिकले पाहिजे. त्यात गर्व कशाला? प्रत्येक गोष्ट चांगली करता आली पाहिजे. 'जे जे करीन ते उत्कृष्ट करीन' असे माणसाचे ध्येय असावे. पत्रावळ लावणे असो वा ग्रंथ लावणे असो, शेण लावणे असो, वा शेला विणणे असो. माझ्या वडिलांचा हा गुण होता. ते धुणी दांडीवर वाळत घालीत तर कशी सारखी घालीत. टोकाला टोक मिळालेले. आमच्या गावात एक गरीब गृहस्थ होते. ते गोंधळेकरांकडे धुणी वाळत घालण्याचे काम करीत. ते इतकी छान धुणी वाळत घालीत की, पाहात बसावे. माझे वडील भाजीच्या दळयांना पाणी शिंपीत. त्या वेळेस किती बारीक धारेने शिंपीत, हाताने धार धरून शिंपीत; परंतु ते काळजी घेत. प्रत्येक गोष्टीत नीटनेटकेपणा असला पाहिजे. सौंदर्य असले पाहिजे.

माझ्या आईने मला प्रत्येक गोष्ट मनापासून करावयास शिकविले. प्रत्येक गोष्ट चांगली करावयास


86 of 468

काटर्याला रडायला' अहो, 'असाच रोज रडतो' वगैरे बोलणी आईच्या कानावर येतात व तिला वाटते की, मुलासकट पृथ्वीच्या पोटात गडप व्हावे! च्यावच्याव करणारी तमासगीर मंडळीच जगाच्या बाजारात फार.


माझ्या आत्याला त्या वेळेस तसेच झाले. मूल तर राहीना. माझी आई जवळच होती. माझ्या आईने आपल्या मुलास गडयाजवळ दिले व ती आत्याला म्हणाली, 'वन्सं, माझ्याजवळ द्या त्याला. मी त्याला घेत्ये हो.' आईने प्रेमाने आत्याच्या मुलाला घेतले व त्याला पाजले. तो बाळ पोटभर माझ्या आईच्या अंगावर प्याला; हसू खेळू लागला.


आई


86 of 773