लावले. आपण लावलेली पत्रावळ कोणालाही मांडतील. जर ती नीट नसेल तर जेवणाराच्या घशात टाका जावयाचा! पत्रावळ लावताना मनात म्हटले पाहिजे, 'कोणीही हिच्यावर जेवो नीट जेवता येईल. घशात टाका जाणार नाही. फटीतून अन्न खाली जाणार नाही.' मी चांगली पत्रावळ लावण्यास शिकलो.

एक दिवस माझ्या हातची पत्रावळ मुद्दाम वडिलांसाठी मांडली. वडिलांनी विचारले, 'चंद्रये ! तुझी का ग पत्रावळ?'

अक्का म्हणाली, 'नाही. ती श्यामने लावलेली आहे.'

वडील म्हणाले, 'इतकी चांगली केव्हापासून यावयास लागली?'

आई म्हणाली, 'त्या दिवशी जेवायला घातले नाही व तू चांगली पत्रावळ लावीपर्यंत तुझी तुलाच घ्यावी लागेल, असे सांगितले म्हणून नीट शिकला लावायला.'

मी आईला म्हटले, 'आता मागचे कशाला सांगतेस? भाऊ ! आता चांगली येते की नाही मला?'

'आता काय सुंदरच लावता येते; पण द्रोण कुठे लावता येतो?' वडील म्हणाले. 'द्रोणही मी लावून


87 of 468

त्या लग्नात स्वत:च्या मुलासही रडवी परंतु वन्संच्या मुलाला अगोदर शांत करी. मुलांना काय गोड दूध आईचे मिळाले की, राजेच ते! आत्याचे मूल रडू लागताच आईने घ्यावे, पाजावे. आईने कधी कुरकुर केली नाही; उलट तिला परमधन्यता वाटे, परमसुख व समाधान वाटे.


माझी आई ती गोष्ट एकादे वेळेस सांगे व म्हणे, 'श्याम, अरे जवळ असेल ते दुसर्यारस द्यावे. दुसर्याेचे अश्रू थांबवावे, त्याला हसवावे, सुखवावे. या आनंदासारखा आनंद नाही. स्वत:च्या मुलाचे, श्याम कोणीही कोडकौतुक करील; परंतु दुसर्यााच्या मुलाचेही


87 of 773