ठेवला आहे. विहिरीवर अक्काने लावलेला एक द्रोण मी घेऊन आलो व त्याच्यासारखा लावीत बसलो. शेवटी साधला. मी तुम्हाला जेवण झाल्यावर दाखवीन.' मी सांगितले.

माझ्या पत्रावळीचे गुणगान झाल्यामुळे मी जरा फुशारून गेलो होतो. जेवण झाल्यावर मी द्रोण वडिलांस दाखविला. 'चांगला आहे, परंतु येथे चुकला. समोरासमोरचे कोपरे सारख्या दुमडीचे हवेत.' असे म्हणून त्यांनी सुधारून दिला. मी तो सुधारलेला द्रोण आईला नेऊन दाखविला.

'आता कोण रागे भरेल?' उगीच हट्ट करतो व मला हे येणार नाही ते येणार नाही म्हणतोस. देवाने ज्याला हातपाय दिले त्याला सारे काही करता येते. मनात मात्र हवे. चंद्रये, याला एक जर्दाळू दे. शिकल्याबद्दल खाऊ.' आईने सांगितल्याप्रमाणे अक्काने फडताळातून एक जर्दाळू मला दिला. तो किती गोड लागला! समुद्रमंथनानंतर देवांना अमृतही तितके गोड लागले नसेल. गोडी वस्तूत नसून वस्तूसाठी केलेल्या श्रमात आहे, कर्मातच आनंद


88 of 468

करील, तितक्याच प्रेमाने करील तोच थोर.'


रात्र तिसरी: मुकी फुले


"बारकू, भाकर खाल्ली की नाही रे? येतोस ना आश्रमात?' शिवाने विचारले.


'आई, वाढ ना लौकर. तिकडे सुरूसुध्दा होईल गोष्ट.' बारकू आपल्या आईला घाई करू लागला.


'कसल्या रे रोज उठून गोष्टी ऐकता? रोज तुझी घाई. जा उपाशीच. नाहीतर आल्यावर भाकर खा.' बारकूची आई म्हणाली.


बारकू खरंच निघाला. त्याला त्या भाकरीपेक्षा गोष्टीच आवडत. त्याच्या पोटाला भाकर पाहिजे होती; परंतु त्याच्या हृदयाला श्यामच्या गोष्टीच पाहिजे होत्या.


बारकू


88 of 773