'श्याम! सारी मंडळी आली; प्रार्थनेला चल. सर्वजण वाट पहात आहेत.'
'हो. मी आपला पाहातच राहिलो.' असे म्हणून श्याम त्याच्यासाठी असलेल्या जागेवर जाऊन बसला. प्रार्थना झाली व गोष्टीस सुरूवात झाली.
मित्रांनो! प्रत्येक गोष्टीत संस्कृती भरलेली आहे. प्रत्येक जातीची विशिष्ट संस्कृती असते. सर्वांची मिळून राष्ट्रीय संस्कृती होत असते. प्रत्येक चालीरीतीत संस्कृतीचा सुगंध भरलेला आहे. तो ओळखला पाहिजे. आपल्या सार्याी चालीरीतीत आपण लक्ष घातले पाहिजे. काही अनुपयुक्त चाली असतील त्या सोडून दिल्या पाहिजेत; परंतु संस्कृतीचे संवर्धन करणार्याप चाली मरू देता कामा नये. आपल्या देशातील, आपल्या समाजातील प्रत्येक आचार म्हणजे एक शिकवण आहे.
आमच्या घरी एक अशी पध्दत होती की, रोज दुपारच्या मुख्य जेवणाच्या वेळी प्रत्येकाने श्लोक म्हणावयाचा. जेवताना श्लोक म्हटला नाही तर वडील रागे भरत. वडील आम्हाला श्लोकही सुंदर सुंदर शिकवीत असत. मोरोपंत, वामनपंडित
फार नाद होता. फुलासारखी सुंदर व पवित्र वस्तू जगात कोणतीच नसेल. पृथ्वीवरच्या फुलांनी व आकाशातील तार्यां नी माझ्या जीवनावर अनंत परिणाम केलेले आहेत. माझ्या वडिलांनाही फुलांचा फार नाद. पूजेला भरपूर फुले त्यांना पाहिजे असत. जास्वंद, कर्ण, गुलाब. रास्तुरा वगैरे नाना फुलझाडे शेतावर होती. माझे वडील गणपतीचे मोठे भक्त. दररोज २१ दूर्वांची जुडी ते गणपतीला वाहावयाचे. खुरटलेल्या, वाळलेल्या दूर्वा त्यांनी कधी वाहिल्या नाहीत. वाटेल तितके लांब जातील; परंतु हिरव्यागार, झुबकेदार लांब दूर्वा ते घेऊन