यांचे सुंदर श्लोक व कविता ते शिकवीत असत. तशीच इतर स्तोत्रे, भूपाळया श्लोक वगैरे शिकवीत. पहाट झाली की वडील येत, आम्हास उठवीत. आमच्या अंथरूणावर बसत आणि आम्हाला भूपाळया श्लोक वगैरे शिकवू लागत. आम्ही अंथरूणातच गोधडया पांघरून बसत असू. माझ्या लहानपणी आमच्याकडे ब्लँकिट नव्हते. गोधडी, पासोडी किंवा आईची चौघडी हेच पांघरूण व अंथरूण असावयाचे. गणपतीची, गंगेची वगैरे भूपाळया वडील शिकवीत. 'कानी कुंडलाची प्रभा चंद्रसूर्य जैसे नभा' हे चरण आजही मला मधुर वाटतात. वक्रतुंड महाकाय, शांताकारं, वसुदेवसुतं देवं, कृष्णाय वासुदेवाय, वगैरे संस्कृत श्लोक, तसेच गंगे गोदे यमुने, कृष्णानुजा सुभद्रा, कुंकुममंडित जनके, देवी म्हणे अनार्या, ये रथावरि झणी यदुराया, असा येता देखे, मारावे मजला, अंग वक्र अधरी धरि पावा, वगैरे आर्या व श्लोक ते शिकवीत. हे श्लोक आम्हाला लहानपणी पाठ येत. रोज एखादा नवीन


91 of 468

येतील. 'देवाला साधी दूर्वा वाहावयाची, ती तरी चांगली नको का?' असे ते म्हणत.


माझ्या वडिलांपासून फुलांचे वेड मी घेतले; परंतु आईपासून फुलांवर प्रेम करावयास शिकलो.

मी फुलांसाठी पहाटे उठत असे. आमच्या गावात बकुल वृक्ष पुष्कळ होते. बकुळीची फुले फारच सुंदर व सुवासिक असतात. त्यांच्यात मधही असतो. लहान लहान जणू मोतीच अशी ती दिसतात! लहान लहान बटणेच जणू असे वाटते! बकुळीच्या फुलांच्या मी परडया भरभरून आणावयाचा. सकाळी फुले जमवून ठेवावयाची व दहा वाजता शाळा सुटून


91 of 773