अजूनही फारसा माणसाळलेला झालो नाही. मी लगेच कावराबावरा होतो. श्लोक म्हणत असता कोणी हसला, कोणी टीका केली तर मला वाईट वाटे; परंतु वडील जवळ असले म्हणजे मुकाटयाने म्हणावयास लागे. तेथे गत्यंतर नसे.
त्या दिवशी गंगूअप्पा ओकांकडे समाराधना होती. त्यांचा आमचा फार घरोबा. आमच्याकडे आमंत्रण होते. माझे वडील बाहेरगावी गेलेले होते. दुसर्याोच्या घरी जेवावयास जाण्याची मला लहानपणापासूनच लाज वाटत असे; परंतु कोणी तरी गेलेच पाहिजे होते. हजेरी लागलीच पाहिजे. नाही तर तो उर्मटपणा, माजोरेपणा दिसला असता. त्यांचे मन दुखविले, असे झाले असते. वडील घरी नसल्यामुळे माझ्यावर जेवावयास जाण्याची पाळी आली.
दुपारी स्नान सांगणे आले व थोडया वेळाने मी जेवावयास गेलो. कणेरांगोळया घातल्या होत्या. केळीची सुंदर पाने होती. मी एका आगोतलीवर जाऊन बसलो. उदबत्त्यांचा घमघमाट सुटला होता. उन्हाळयाचे दिवस होते म्हणून पाण्याच्या
काळे मणी फारच सुंदर दिसतात. माझी आई तुळशीच्या अंगणात बसून त्या फुलांच्या माळा करी. गुलबाक्षीच्या फुलांची माळ फुलांचे देठ एकात एक गुंतवून करितात. त्याला सुईदोरा लागत नाही. या माळांचेही अनेक प्रकार असतात. तोडयाची माळ. दुहेरी माळ. बायका निरनिराळया त-हेने ती गुंफतात.
त्या दिवशी रविवार होता. रोज शाळा सुटल्यावर सर्वजण फुले वेचावयास जात असू. पाटीदप्तर घरी ठेवून जो आधी पळत जाई त्याला अधिक फुले मिळत. परंतु रविवारी कोण जाईल याचा नेम नसे. त्याच्या आधीच्या रविवारी मला