शेजारचे गोविंदभट म्हणाले. सारे मी ऐकून घेतले. दक्षिणेची दिडकी कढीत घालून मी तिला लख्ख करीत होतो. इतरांच्या म्हणण्याकडे मी लक्ष दिले नाही. एक मुलगा सर्वांचे जेवण होण्याआधीच उठला, त्याच्यावर सर्वांनी तोंडसुख घेतले. आधी उठणे म्हणजे पंक्तीचा अपमान असे समजण्यात येई.
जेवणे झाली. सर्व मंडळी उठली. मी सुपारी वगैरे खातच नसे. वडील फार रागावत सुपारी खाल्ली तर. विद्यार्थ्यांने सुपारी, विडा खाऊ नये, अशी चाल होती. मी घरी आलो. शनिवार असल्यामुळे दोन प्रहरी शाळेला सुट्टी होती. आईने विचारले, 'काय रे होते जेवावयाला? भाज्या कसल्या केल्या होत्या?' मी सारी हकीकत सांगितली. आईने विचारले, 'श्लोक म्हटलास की नाही?'
आता काय उत्तर देणार? एका खोटयास दुसरे खोटे. एक खोटे पाऊल टाकले की ते सावरावयास दुसरे खोटे पाऊल टाकावे लागते. पाप पापास वाढवीत असते. दृढमूल करीत असते. आईला मी खोटेच सांगितले,
घुबे म्हणतात. ते सारे घुबे मी तोडून आणिले. घरी आल्यावर मी एक ताम्हन घेतले व त्यात पाणी घालून कळया टाकून ठेविल्या.
संध्याकाळी आई म्हणाली, 'आज फुले नाही का रे आणायला जात? मागच्या रविवारच्यासारखा उशिरा गेलास तर एकसुध्दा नाही हो मिळणार. मग रडत बसशील. माळेला नाही तर नाही; पण धुपारतीला तरी चार आणून ठेव.'
'मी तर केव्हाच आणून ठेविली आहेत, तू माळ करतेस का?' मी विचारले.
'आण तर. मी येथेच तुळशीजवळ बसते. म्हणजे घरात डेखे पडायला नकोत.' आई