आई पुन्हा म्हणाली, 'जा, देवाच्या पाया पड. नाही तर घरी येऊ देत, त्यांना सांगेन; मग मार बसेल; बोलणी खावी लागतील.' मी जागचा हललो नाही. मला वाटले, आई वडिलांस सांगणार नाही. ती विसरून जाईल. आजचा तिचा राग उद्या कमी होईल. आई पुन्हा म्हणाली, 'नाही ना ऐकत? बरं! मी आता बोलत नाही.'
वडील रात्रीसच परगावाहून आले होते. रोजच्याप्रमाणे ते पहाटे उठवावयास आले. त्यांनी भूपाळया सांगितल्या, आम्ही म्हटल्या. वडिलांनी मला विचारले, 'श्याम! काल कोणता श्लोक म्हटलास?'
आई ताक करीत होती. तिची सावली भिंतीवर नाचत होती. उभे राहून ताक करावे लागे. मोठा डेरा होता. माथ्यासुध्दा मोठा होता. आईने एकदम ताक करायचे थांबविले व ती म्हणाली, 'श्यामने काल श्लोक म्हटला नाही; मला मात्र खोटेच येऊन सांगितले की, म्हटला. परंतु शेजारच्या मुलांनी सारी खरी हकीकत सांगितली. मी त्याला सांगत होत्ये की, देवाच्या पाय पड
तू गेलास. हा असा आज सूड घ्यावयाचा होता वाटते?' बाबी म्हणाली.
माझी आई सारे ऐकून घेत होती. ती शांतपणे म्हणाली, 'बन्या, बापू! ही घ्या तुम्हाला फुले. पुन्हा नाही हो श्याम असे करणार. नाही ना रे श्याम?' असे म्हणून आईने त्यांना फुले दिली.
'श्याम येत जा हो रोज संध्याकाळी फुले वेचायला; नाहीतर राग धरावयाचास तू. का आत्ताच येतोस? आपण छाप्पोपाणी, नाहीतर लक्षूबाई ताक दे, डेरा फुटला मडकं दे, तो खेळ खेळू.' बन्या म्हणाला.
माझी आई म्हणाली, 'आता उशीर झाला आहे. उद्या खेळा हो बन्या,